खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील खेड-आंबवली मार्गावरील कुडोशी येथील जगबुडी पुलावर बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुंद असलेल्या जगबुडी पुलावरून दोन्ही वाहने समोरासमोर येत असताना चालकांचा अंदाज चुकल्याने हा अपघात घडला. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तसेच एसटी प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पुल अरुंद असल्यामुळे अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका येथे कार्यरत असलेल्या श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेनेही तात्काळ घटनास्थळी धाव घेत आवश्यक मदतकार्य केले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे अरुंद पुलांवर वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
























































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)






































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.