loader
Breaking News
Breaking News
Foto

राजेंद्र माने पॉलिटेक्निकची माजी विद्यार्थिनी ठरली मराठी बिग बॉस पर्व ६ ची विजेती

आंबव : देवरुख येथील राजेंद्र माने पॉलिटेक्निकमध्ये माजी विद्यार्थिनी तन्वी कोलते हिने मराठी बिग बॉस पर्व ६ या लोकप्रिय स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल तिचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तन्वी कोलते ही या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून तिने सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतून डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.या कार्यक्रमास प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, पॉलिटेक्निकचे प्राचार्य भोपळे सर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत सर, सर्व प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या भाषणात तन्वीच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत तिच्या चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना तिच्या प्रवासातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. संस्थेच्या कार्याध्यक्षांनीही तन्वी कोलते हिचे अभिनंदन करत तिच्या यशामुळे महाविद्यालयाची प्रतिष्ठा अधिक उंचावली असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला. या प्रसंगी तन्वी कोलते हिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात तिने महाविद्यालय, शिक्षक आणि मार्गदर्शकांचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवून संधींचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. तन्वी कोलते हिच्याशी संवाद साधताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. या सत्कार सोहळ्याने तन्वी कोलते हिच्या यशाचा गौरव तर झालाच तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेशही मिळाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg