loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण वालोपे भीषण अपघातातील आग्रे कुटुंबीयांना आमदार प्रमोद जठार यांचा दिलासा

खेड - मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. या दुर्दैवी अपघातात आग्रे कुटुंबीयांसह त्यांच्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद घटनेनंतर आमदार प्रमोद जठार यांनी पीडित आग्रे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत ५० हजार रुपयांची आर्थिक मदतही प्रदान केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, रत्नदीप देवळेकर, बूथ प्रमुख तसेच भाजपचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. या भीषण अपघातामुळे संपूर्ण चिपळूण तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg