loader
Breaking News
Breaking News
Foto

कुवारबाव साईनगरमधील युवकाच्या हत्येवेळी उपस्थित असणार्‍या तरुणीला तपास व चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स

रत्नागिरी : कुवारबाव-साईनगर येथील खुन प्रकरणाने कलाटणी घेतली आहे. संपूर्ण घटनेच्या वेळी घटनास्थळी असलेली मुख्य आरोपीची मैत्रिण हत्येनंतर अचानक बेपत्ता झाली होती. मात्र रत्नागिरी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिचा माग काढला आहे. ती मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिला तात्काळ चौकशीसाठी रत्नागिरीत हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. साईनगर येथे २१ मे ला सुरज झोरे या तरुणाच्या निर्घृण खून झाला होता. सोहम म्हात्रे हा या खून प्रकरणातील मुख्य संशयित आहेत. सुरजवर हल्ला झाला तेव्हा सोहमची मैत्रिण आरोपींसोबतच होती. तिच्या डोळ्यांदेखतच आरोपींनी सुरजवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मानेवर आणि हातावर गंभीर वार झेलत सुरजने जिवाच्या आकांताने शेजारच्या एका घराच्या कंपाउंडमध्ये उडी मारून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून तिथेच त्याचा जीव घेतला. या थरारक प्रसंगानंतर संबंधित तरुणी प्रचंड घाबरली होती आणि ती अचानक गायब झाली होती. पोलिस चौकशीत समोर आलेल्या तपशिलानुसार मृत सुरज झोरे याने सोहमच्या मैत्रिणीला तू सोहमवर जास्त विश्वास ठेवू नकोस, असा सल्ला दिला होता. सुरज तिचे मन वळवण्याचा म्हणजेच तिला फितवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सोहमला मिळाली. याच रागातून सोहम म्हात्रे याने सुरज झोरेचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित कट रचला. याप्रकरणी मुंबईतील दहिसर येथील रहिवासी नंदा फाले यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टाईम्स स्पेशल

पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी सोहम एकनाथ म्हात्रे (वय १८), अभिषेक देवानंद राठोड (वय २२) आणि नजीबुल हसीबार शेख उर्फ सोनू (वय २१) या तिघांना अटक केली आहे. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेला धारदार कोयताही पोलिसांनी हस्तगत केला आहे. मात्र या घटनाक्रमाचा भक्कम प्रत्यक्षदर्शी पुरावा ही सोहमची मैत्रिण आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्या जबाबासाठी तिचा शोध घेतला असता मुंबईमध्ये ती मिळून आली. तिला जबाबसाठी हजर राहण्यासाठी पोलिसांनी समन्स बजावले आहे. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्या ती मैत्रिण अडकणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg