सावंतवाडी : वन विभागाने खैर लाकडाच्या बेकायदेशीर तस्करीविरोधात कारवाई केली आहे. दोडामार्गहून तळवडे येथे विनापरवाना चाललेली खैराची तस्करी वन विभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली असून, यामध्ये सुमारे १२ ते १४ लाख रुपये किंमतीचा २९ घनमीटर खैर माल आणि एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे खैर तस्करांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोमधून विनापरवाना खैर लाकडाची वाहतूक होणार होती. या माहितीच्या आधारे वनपरिमंडळ आजगाव आणि वनपरिमंडळ बांदा येथील कर्मचार्यांनी बांदा फॉरेस्ट चेक पोस्ट व इन्सुली खामदेव नाका परिसरात सापळा रचला होता. दरम्यान, संशयित टेम्पो बांदा चेक पोस्टवर आला असता, वनकर्मचार्यांना पाहून चालकाने टेम्पो थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने पुढे नेला.
वनरक्षक इथापे यांनी तात्काळ या वाहनाचा पाठलाग सुरू केला. अधिकार्यांना हुलकावणी देण्यासाठी टेम्पो चालकाने खामदेव नाक्यावरून अचानक ’यू-टर्न’ घेतला आणि टेम्पो पुन्हा गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळवला. मात्र, वनरक्षकांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. अखेर पत्रादेवी गोवा चेक पोस्टच्या मागे वनविभागाने या टेम्पोला अडवले. आपल्याला चहुबाजूने घेरल्याचे लक्षात येताच चालक टेम्पो रस्त्याच्या कडेला लावून पळून गेला. वन अधिकार्यांनी सदर टेम्पो ताब्यात घेऊन त्याची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये कोणतीही परवानगी नसलेला सुमारे २९ घनमीटर खैर माल आढळून आला. या जप्त केलेल्या खैराची बाजारपेठीय किंमत अंदाजे १२ ते १४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक चौकशीत सदरचा खैर माल आणि टेम्पो वजराट येथील गोविंद गवस यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. हा माल दोडामार्ग येथून विनापरवाना वाहतूक करून तळवडे येथे नेण्यात येत होता, अशी माहिती चौकशीदरम्यान उघड झाली आहे. सदरची धडक कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, आजगावचे वनपरिमंडळ अधिकारी प्रताप यांच्या पथकाने केली. या यशस्वी कामगिरीत वनरक्षक वैभव इथापे, अतुल पाटील, प्रकाश रानगीरे, मोहिते तसेच गोवा वन विभागातील वनरक्षक विशाल परब यांनी सहभाग घेतला होता. या प्रकरणी वन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.