यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी प्रणव सडवेलकर याने आरएचसीएसए - रेड हॅट सर्टिफाईड सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर परीक्षेत ३०० पैकी ३०० गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रणवने मिळवलेले हे यश संस्थेसाठी अभिमानास्पद ठरले आहे. जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त असलेल्या रेड हॅट सर्टिफिकेशन मध्ये परिपूर्ण गुण मिळवणे ही अत्यंत दुर्मिळ आणि उल्लेखनीय कामगिरी मानली जाते. आरएचसीएसए - रेड हॅट सर्टिफाईड सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर हा जगभरात मान्यता प्राप्त लिनक्स सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेशन संबंधित व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम, सर्व्हर मॅनेजमेंट, सिस्टिम कॉन्फिगरेशन, युजर ऍडमिनिस्ट्रेशन, नेटवर्किंग, सिक्युरिटी, स्टोरेज मॅनेजमेंट तसेच ट्रबलशूटिंग यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
आजच्या डिजिटल युगात क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, डेव्हऑप्स आणि डेटा सेंटर मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्ये लिनक्स प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे आरएचसीएसए प्रमाणपत्राला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांमध्ये आरएचसीएसए प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाते. प्रणवने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेतील इतर विद्यार्थ्यांनाही कौशल्याधारित व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमांकडे प्रेरणा मिळणार आहे. संस्थेच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.