देवळे (प्रकाश चाळके) - मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात एसटीच्या अद्ययावत गाड्या दाखल झाल्या आहेत. राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या नावाने सुरू असलेल्या जिजाऊ बस रत्नागिरीत दाखल झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. पण हा आनंद देवरूख आगाराशी संबंध असलेले एसटीचे प्रवाशांना मात्र क्षणिक समाधान देत आहे. या नव्या बस फक्त रत्नागिरी आगाराला देण्यात आल्या असून देवरूख आगार डबघाईस आलेल्या अवस्थेत असताना देवरूख आगाराला आश्वासनांची खैरात मिळाली आहे. या प्रकारामुळे आशेवर असलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. संगमेश्वर तालुक्यातील स्थानिक प्रतिनिधी या विषयावर मुग गिळून गप्प का बसले आहेत? अशा परखड शब्दात लोकप्रतिनिधींचा पान उतारा नागरिक करीत आहेत. देवरूख आगारातील गाड्यांची कमतरता. कर्मचारी तुटवडा, आगाराची जुनी इमारत अशी रोडावलेली परिस्थिती आहे. एसटी उपलब्ध नसल्याने अनेक गावांमधील फेऱ्या बंद करण्यात आल्या. नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. या ज्वलंत समस्येतून एक लोकचळवळ उभी राहिली "एक सही-देवरुख आगारासाठी" या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जनतेचा वाढता रोष ध्यानात घेऊन लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री सामंत यांना परिस्थितीची माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली, चर्चा झाली. देवरुख आगाराच्या सर्व समस्या सोडविण्याची ग्वाही देण्यात आली. त्यामुळे समाधानाने या मोहिमेला विराम देण्यात आला. वाटलं होतं देवरूख आगाराच्या बस कमतरता या समस्येचे निराकरण करण्यात येईल. कारणही तसे खासच आमदार निकम यांनी देवरूख आगाराला ३६ बस तातडीने मिळाव्या यासाठी परिवहन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती. परंतु प्रत्यक्षात जिजाऊ बस रत्नागिरीत जिल्ह्यात दाखल झाल्या तेव्हा देवरूख आगाराला वाटाण्याच्या अक्षता देण्यात आल्या. रत्नागिरी आगाराला त्या सर्व बसेस देऊन देवरूख आगाराच्या सळसळत्या जखमेवर मीठ चोळले आहे. देवरूख आगारातील गाड्यांचा जुना ताफा लवकरच भंगारात जमा होणार, असे झाले तर देवरूख आगारातील प्रवासी वाहतूक ठप्प होईल. जनसामान्यांची जिवन वाहिनी असलेली एसटी अशा मरणासन्न अवस्थेत असताना लोकप्रतिनिधी कसे स्वस्थ बसू शकतात हे न उलगडणारे कोडे आहे.
आंदोलन सुरू झाले की त्यातली धग कमी करण्यासाठी आश्वासने द्यायची. जनसामान्यांच्या उद्रेकाला आश्वासनांची खैरात मिळते. जेव्हा पदरी काही पडेल अशी शक्यता असते तेव्हा पदरात भोपळा येतो. याची अनुभूती देवरूख आगाराशी संबंधित असलेल्या एसटीच्या प्रवाशांना येत आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार रत्नागिरी आगाराला अद्ययावत बसेस मिळणार असतील तर देवरूख आगाराला वाली कोण? इथल्या प्रवाशांच्या सेवेचा बट्ट्याबोळ झाला त्याला जबाबदार कोण? केवळ आश्वासनांची बोळवण, आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. देवरूख आगार सुस्थितीत सुरू रहावे. इथल्या प्रवाशांच्या सेवेचा गंभीर प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी देवरूख आगाराला बस कधी मिळणार? असा येथील प्रवासी जनतेचा शासन कर्त्यांना सवाल आहे.
































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.