loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरूख नगर पंचायत निवडणूकत जनता कोणाला धोबीपछाड देणार याकडेच लक्ष

देवरूख (सुरेश सप्रे) देवरूख नगर पंचायत निवडणूकत नगराध्यक्ष पदासह १७प्रभागात आज मतदान होत असताना मतदार बदल घडविण्यासाठी विरोधकांना संधी देणार की सत्ताधाऱ्यांना तारणार की घरी बसविणारा याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून दि. ३ला होणाऱ्या मतमोजणी नंतरच शहरवासीय सुजाण मतदार जनतेने नक्की काय चमत्कार करून कोणाला तारले व कोणाला धोबीपछाड दिला हे स्पष्ट होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नगर पंचायतीच्या निवडणुकीत '' शत्रूचा शत्रू तो मित्र'' या तत्त्वांचा अवलंब करून स्थानिक पातळीवर शहकाटशह करत आपले प्रस्थ अबाधित ठेवण्यासाठी छुपे राजकीय डावपेच खेळले जात असतानाच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत सुरू झाल्या सत्ताधाऱ्यांनकडून प्रचारात निधी व पैसा हाच मुद्दा आणला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात होता. सर्व पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी सर्व साधारण महीला राखीव जागा आरक्षित असुन ही त्याकडे दुर्लक्ष करून भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय महायुतीकडून पुन्हा भाजपाच्या सौ. मृणाल शेट्ये.यांना सधी दिली. तर उबाठा शिवसेना - भारतीय काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व वंचित बहूजन महा आघाडीच्या सौ. सबुरी थरवळ यांना मैदानात उतरले. शहर आघाडीच्या सौ. स्मिता लाड यांना अपक्ष उभे केले. आप-गाव विकास आघाडी युतीच्या सौ. दिक्षा खंडागळे या ओबीसी प्रवर्गातील सुशिक्षित महीलांना संधी दिली आहे तर अपक्ष म्हणून उच्च शिक्षित तरुण तडफदार युवती वेदिका मोरे यांनी हाती पुस्तक घेत दंड थोपटले आहेत. या पंचरंगी होत असलेल्या लढतीत देवरूख मधील जनता कोणाला कौल देत नगराध्यक्षपदी कोणाला विराजमान करते हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

टाइम्स स्पेशल

सात वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकीत आरक्षण पडल्या पासूनच प्रत्येक पक्षांकडून मोर्चे बांधणीसाठी प्रयत्न सुरू केले गेले होते. सत्ताधारी असलेली महायुती या निवडणुकीत होणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार यावर चर्चाचर्वण व काथ्याकूट सुरू असताना अखेरीस महायुती म्हणून लढविल्या जातील असे जाहीर करण्यात आले असले तरी बंडखोरीच्या भितीने देवरूख नगर पंचायत निवडणूकीच्या अर्ज भरण्याची वेळ संपत आली तरी मात्र जागा वाटप व उमेदवार वेळीच जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामूळे संभ्रम निर्माण झाला होता.. महा आघाडीने मात्र सर्वोंशी समन्वय साधत आघाडीचे उमेदवार जाहीर करीत बाजी मारली होती. अखेर महायुतीने जागा वाटप जाहीर केले. पण उमेदवारीचा सस्पेंन्स कायम होता. अर्ज भरण्याची आदल्या दिवशी जागा वाटप व उमेदवार जाहीर करत भाचपाचे निवडणूक प्रमुख आम. निरंजन डावखरे अतुल काळसेकर आम. शेखर निकम माजी आम सुभाष बने या मान्यवर नेत्यांच्या उपस्थित शहरात प्रचाराचा शुभारंभ केला.. भाजपाने जागा वाटपात आपले मागिल निवडणुकीत विजयी प्रभाग सोडून माघार घेत अन्य प्रभाग मिळवत महायुती सुरळीतपणे झाली करून घेतली असली तरी भाजपातील अनेकांनी काही प्रभाग स्वता वा नातलगांसह बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेत बंड केले आहे.. आठ वर्षांच्या कारकीर्दीतील काळात शहराची केलेली प्रगती. घन कचरा प्रकल्प. सुसज्ज प्रशासकीय इमारतीचे काम. भविष्यातील पाणी नियोजनासाठी धरण व विस्तारीत नळपाणी पुरवठा योजना. अग्निशमन गाडी. जनतेच्या साथीने स्वछता अभियानांतर्गत मिळविलेला राज्यात प्रथम क्रमांक. वाडी वस्तीवर गटारांची सुविधा.स्ट्रीट लाईट आदी केलेल्या कामांचा महायुती कडून झालेला प्रचार तर जनतेला आता बदल हवाय. पैशाचा वापर. विकास कामांवर व प्रशासनावर अंकुश नसलेले नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश. रखडलेला विकास आराखडा सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनाशी हात मिळवत झालेला भ्रष्टाचार. पैशाच्या जोरावर लोकशाही खिळखिळी करण्याचा डाव आदी विविध मुद्दय़ांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेले जोरदार प्रहार याला काही अंशी आलेले यश.काहींना थेट देवालाच साक्षी ठेवत शहराच्या विकासासाठी ग्राप.पंचायत समिती. नगर पंचायत या माध्यमातून विविध पदांवर जनप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामांमुळे सर्वत्र अंकुश ठेवून विकासाबरोबर रोजगार निर्मिती करण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देत स्वतंत्र विकास पॅनल करत वन टू का फोर करण्यासाठी या रणांगणात घेतलेली उडी व प्रचारात मारलेली उंचझेप घेत गतवेळी हुकलेली संधी मिळविण्यासाठी मारलेली जोरदार मुसंडी यामुळे आज मतदान करताना मतदार राजा नक्की कोणाला साथ देत हात देतो की दाखवतो? याची प्रचिती येईल .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg