loader
Breaking News
Breaking News
Foto

मृग नक्षत्रात पेरे केलेल्या शेतकर्‍यांची ग्रामीण भागात लावणी कामाला सुुरुवात

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - मृग नक्षत्रात ग्रामीण भागात ज्या शेतकर्‍यांनी पेरे केले ते पेरे आता लावणीयोग्य झाले असून पावसाने उसंत घेतल्याने मळे शेती भागात लावणी कामाला वेग आला आहे. शेतकर्‍यांनी भल्लरीच्या स्वरात दाढ काढून लावणी सुरु केली आहे. तसेच वलाट पटयात अजूनही नाचणी वरी पेरे सुरु आहेत. लावणी कामाला सुरुवात झाल्याने ग्रामीण भागात मळे गजबजून गेले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदा पावसाने शेतकर्‍यांना दगा दिल्याचे म्हटले जात असतानाच मृग नक्षत्रानंतर केलेल्या पेरण्या फलदायी ठरताना दिसत आहेत. पेरा चांगलाच रुजून आला आहे. तसेच लावणीयोग्य पेरा रुजून आल्याने आता ग्रामीण भागात लावणी कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग शेतीकामात मग्न झाल्याचे दिसून येते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg