loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षेचा बोजवारा; अनधिकृतपणे काढलेल्या क्रॅश बॅरिअरमुळे भीषण अपघात

संगलट (खेड )(इक्बाल जमादार) - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हलगर्जीपणामुळे नियमबाह्य पद्धतीने खाजगी व्यावसायिकांकडून रस्त्यावरील क्रश बॅरिअर अनधिकृत पणे तोडून टाकण्याच्या हुकूमशाही पद्धतीमुळे एक टेम्पो चालक बॅरियरला धडकून क्रॅश बॅरिअर वाहनाच्या पुढील बाजूकडून घुसून पाठीमागील बाजूकडे निघाला मात्र “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीप्रमाणे नशीब बलवत्तर म्हणून टेम्पो चालकाचा मृत्यू टळला परंतु अनधिकृत पणे क्रॅश बॅरिअर तोडणाऱ्या व्यावसायिकांविरोधात राष्ट्रीय महामार्ग विभाग एखाद्या मोठ्या अपघातात जीवित हानी झाल्यानंतरच डोळे उघडणार का? असा सवाल वाहन चालक राष्ट्रीय महामार्ग विभागास विचारत आहेत. पावसाळ्याचा हंगाम चालू झाल्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर कशेडी घाटापासून महाड, माणगाव, इंदापूर, कोलाड, नागोठणे, पेण व पनवेल पर्यंतच्या हद्दीत वेगवेगळ्या कारणामुळे अपघाताची मालिका चालू झाली आहे. अद्याप पर्यंत झालेले अपघात किरकोळ स्वरूपाचे असले तरी यातून जीवित आणि टळली आहे. मात्र पुढील पावसाळ्याचा हंगाम पाहता राष्ट्रीय महामार्ग विभाग डोळे उघडून जागे होणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड जवळील केभुर्ली या ठिकाणी चालत्या ईरटीका कारवर दगड कोसळला मात्र जीवित हानी टळली. त्याच पद्धतीने त्याच रात्री सुकेळी खिंडीत अवघड वळणावर ट्रेलर चालकाला वाहनाचा वेग नियंत्रणात आणण्यास अपयश आल्याने एक ट्रेलर दुसऱ्या टेलर वर जाऊन धडकला. या ठिकाणी देखील मात्र जीवित हानी झाली नाही, मात्र पुन्हा एकदा महाड जवळील वहूर गावच्या हद्दीत२४. जूनच्या मध्यरात्री महाड कडून मुंबई बाजूस जाणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीचा एमएच. ४७ . ए .एस.३८२९ या टेम्पोच्यालाकाला रस्ता व्यवस्थित न दिसल्याने रस्त्याच्या बाजूला एका खाजगी व्यावसायिकाने रस्त्यावर असणारे क्रॅश बॅरियर अर्धवट अवस्थेत काढून टाकल्याने सदरचा टेम्पो क्रॅश बॅरियर ला जाऊन धडकला ही धडक एवढी गंभीर होती की क्रॅश बॅरियर पुढील इंजिन बाजू कडून निघून पाठीमागील बाजूस मालवाहतूक असणाऱ्या जागेतून आरपार निघाला केवळ दैव- बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg