loader
Breaking News
Breaking News
Foto

कै.डॉ.मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील दाभोळ गावातील गरजू पेशंट्सच्या सोयीचा विचार करून कै.कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान मार्फत रुग्णोपयोगी साहित्य केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्रात पेशंट फाऊलर बेड्स, व्हील चेअर, वॉकर, स्टिक्स, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, स्ट्रेचर, कमोड चेअर, युरिन पॉट इ. साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्रास दाभोळ येथील सुप्रसिद्ध डॉक्टर कै.मधुकर भिकाजी लुकतुके यांचे नाव देण्यात आले असून या केंद्रातील साहित्य खरेदीसाठी डॉ.लुकतुके यांचे नातू आदित्य पंडित, शंतनू गुर्जर यांनी प्रतिष्ठानला मोलाचे सहकार्य केल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी उद्दृत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हंटले की प्रतिष्ठान मार्फत सुरू होणारे केंद्र दाभोळच्या गरजू-गरीब पेशंटससाठी एक मोठी उपलब्धी ठरेल तसेच याचे नियोजन पाहणारी युवकांची टीम देखील निस्वार्थी भावाने काम करत आहे. याबदल त्यांचे अभिनंदन या कार्यक्रमासाठी दाभोळ परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर्स, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपीनदादा पाटणे, कार्यवाह गंगाराम इदाते, डॉ.आनंद गोंधळेकर, रोहन तोडणकर, ओमकार कात्रे, राहुल गोंधळेकर, कौस्तुभ वैद्य, रोहन यादव, दीप कुडाळकर, दीपक कुतरेकर, संदेश साळवी, सुनील पाथे, विनय पारदळे, पंकज पालकर, किशोर तांबडे आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg