खेड (प्रतिनिधी) - खेड नगर परिषदच्यावतीने नगराध्यक्ष माधवीताई राजेश बुटाला यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली. पावसाळ्यामध्ये खेड शहरात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना कशा पध्दतीने मदत कार्य करावे व त्याकरिता लागणाऱ्या सर्वकष सामुग्रीची माहिती देण्यात आली. प्रशासनातर्फे आपत्तीजनक परिस्थित कशा प्रकारे यंत्रणा राबविता येईल यावर चर्चा करण्यात आली. मोक ड्रीलद्वारे जनतेमध्ये जागरूकता यावी यासाठी सूचना देण्यात आली.
शिवसेना गटनेते निकतन पाटणे यांनी स्वयंसेवकांजवळ संवाद साधला. या बैठकीला खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, माझे सहकारी स्वच्छता, वैद्यक व आरोग्य सभापती तौसिफ खोत, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका खेडेकर, गटनेते रहीम सहिबोले, नगरसेवक आरिफ मुल्लाजी, नगरसेविका रेश्मा खतीब, नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेविका संजना कुडाळकर, खेड नगरपरिषदेचे सर्व विभागीय अधिकारी, खेड शहरामध्ये मदत कार्यात तत्पर कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते, एनजीओ चे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.








































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.