मालवण (प्रतिनिधी) - मालवणातील शिवकालीन परंपरा लाभलेला मुस्लिम बांधवांचा मोहरम ताजिया उत्सव शुक्रवारी शहरातून ताजिया (ताबूत) मिरवणुक काढून साजरा करण्यात आला. मालवण बाजारपेठेतून भरड नाका ते मेढा अशी ढोल ताशांसह ताबूत मिरवणूक पार पडली. शिवकाळात किल्ले सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेले किल्लेदार मुस्लिम बांधव होते. तेव्हापासून हिंदू व मुस्लीम धर्मात सर्वधर्म समभावाचे प्रतिक असणारा मोहरम ताजिया उत्सव शिवरायांनी मालवणात सुरु केला. ही शिवकालीन प्रथा आजही हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरी होताना दिसते.
या उत्सवानिमित्त आज किल्ले सिंधुदुर्ग येथील मुस्लिम-हिंदू बांधवानी किल्ल्यात बनविलेला ताबूत दुपारी १ वाजता शिवराजेश्वर मंदिरात आणण्यात आले. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यात आली. शिवराजेश्वर मंदिरा सभोवताली ताबूत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर हा ताबूत समुद्रातून होडीच्या सहाय्याने मालवण मेढा येथील पिराची भाटी येथे आणण्यात आला. पिराची भाटी येथे आणखी एक ताबूत सजवून ठेवण्यात आला होता. या दोन्ही तांबुतांची मालवण मेढा येथून बाजारपेठ मार्गे भरड नाका ते मार्गे फोवकांडा पिंपळ येथून पुन्हा मेढा राजकोट अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीतील ताबूत आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. या मिरवणुकीत मुस्लिम - हिंदू बांधव सहभागी झाले होते. मिरावणुकीदरम्यान नागरिकांनी ताजियाचे दर्शन घेतले. मिरवणुकीनंतर सायंकाळी मेढा राजकोट येथे या ताजीयाचे विसर्जन करण्यात आले.































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.