loader
Breaking News
Breaking News
Foto

पिकुळे येथील तरुणाचा शेत विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

दोडामार्ग (प्रतिनिधी) - येथून जवळच असलेल्या पिकुळे गावातील तरुण मेघश्याम विलास गवस, वय वर्षे २४ या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी मधलीवाडी येथील शेत विहिरीत सडलेल्या स्थितीत आढळून आल्याने परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे. या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याबाबत तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी आशिष उमेश गवस, याने दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद झाली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात दिला. हा युवक दोडामार्ग मध्ये एका हॉटेल मध्ये कामाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg