वरवेली (गणेश किर्वे) - मनसे नेते नितीन सरदेसाई आणि शिरिष सावंत हे दि. २८ जून व २९ जून रोजी दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी आढावा बैठका आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये रविवार दि.२८ जुन २०२६ रोजी राजापूर... सकाळी ठिक १० वा. स्थळ शासकीय विश्रामगृह राजापूर व लांजा तालुका, संगमेश्वर तालुका सकाळी १० वा. स्थळ अपरांत हॉलिडे होम देवरुख (संगमेश्वर तालुका), रत्नागिरी सायंकाळी ४.३० वा. स्थळ शासकीय विश्रामगृह रत्नागिरी, सोमवार दि. २९ जून रोजी गुहागर सकाळी १० वा. स्थळ हेमंत हॉटेल शृंगारतळी ता. गुहागर, चिपळूण दुपारी १२ वा.स्थळ अतिथी हॉटेल चिपळूण (तालुका व खेड तालुका), दापोली दुपारी ४ वा.स्थळ मधू मालती निवास गिम्हवणे (संतोष शिर्के निवासस्थानी दापोली व मंडणगड तालुका) मनसेचे दोन्ही नेते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी, शाखाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका सचिव तसेच आजी माजी पदाधिकारी, महिला संघटना कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. पक्ष संघटना बळकट करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी, सदस्य नोंदणी, संघटनात्मक कामाचा आढावा आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
बैठकांमध्ये प्रत्येक तालुक्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात येणार असून, पदाधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेत पुढील काळातील पक्षाच्या कार्यक्रमांची रूपरेषाही निश्चित केली जाणार आहे. या दौऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मनसेच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून, जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी केले आहे.































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.