loader
Breaking News
Breaking News
Foto

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी राज्यात 4500 शिक्षकांची नियुक्ती; परिवहन विभागाचा मोठा उपक्रम

मुंबई - राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज बोलता, समजता आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी राज्यभरात तब्बल 4500 शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईत आयोजित रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काम करणाऱ्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि इतर मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातील चालक रिक्षा आणि टॅक्सी व्यवसायात कार्यरत आहेत. अनेकदा भाषेच्या अडचणीमुळे प्रवासी आणि चालकांमध्ये संवादाचा अभाव निर्माण होतो. ही समस्या दूर करण्यासाठी मराठी शिक्षण अभियान उपयुक्त ठरणार असल्याचे सरकारचे मत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg