loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कोकणकन्या एक्सप्रेस ८ तास उशिराने खेड स्थानकात दाखल

खेड (दिलीप देवळेकर) - कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्याचा फटका शनिवार, २७ जून रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मडगावकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक १०१११ कोकण कन्या एक्सप्रेसला बसला. खेड रेल्वे स्थानकावर पहाटे ३.०४ वाजता दाखल होऊन ३.०६ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होणारी ही गाडी तब्बल आठ तास उशिराने सकाळी ११.१० वाजता खेड स्थानकात पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विलंबामागे शुक्रवार, २६ जून रोजी मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी ७.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटलेल्या मांडवी एक्सप्रेसच्या थर्ड इकॉनॉमी (3E) एसी डब्यांतील वातानुकूलन यंत्रणा खेड स्थानकापासूनच बंद पडली. त्यामुळे डब्यातील प्रवाशांची अक्षरशः घुसमट झाली. उकाड्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि रेल्वे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

यानंतर मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबवून इंजिन बदलण्यात आले. सुमारे २५ मिनिटांच्या थांब्यानंतर वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र या तांत्रिक बिघाडामुळे मांडवी एक्सप्रेस उशिराने धावली आणि त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांवरही झाला. परिणामी, कोकण कन्या एक्सप्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. कोकण रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवरून तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg