loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर युवासेना तालुकाप्रमुख इम्रान घारे यांचा पदाचा राजीनामा ​

शृंगारतळी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गुहागर युवासेना तालुकाप्रमुख इम्रान रफिक घारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यासंबंधीचे अधिकृत पत्र जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे यांच्याकडे पाठवले आहे. ​इम्रान घारे यांनी पत्रात नमूद केले आहे की, ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून युवासेना तालुका अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, सध्या काही वैयक्तिक कारणांमुळे आणि कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना या पदावर काम करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी स्वेच्छेने आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून, तो स्वीकारून आपल्याला कार्यमुक्त करावे, अशी विनंती जिल्हाप्रमुखांना केली आहे. पक्षात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले असून, भविष्यातही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाला आपली सदैव मदत राहील, असे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg