loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंब्रल गावातील गाजलेले कलाकार किशोर सावंत यांना इंडियन आयडॉलमध्ये कला सादर करण्याची संधी, सर्वञ कौतुक

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावातील रहिवासी तसेच मुंबई येथील स्थानिक चाकरमानी किशोर शंकर सावंत, यांनी विविध कला सादर करून आपले एक वेगळ विश्व निर्माण केले आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, मुलांचे वाढदिवसामध्ये आपल्या कलेचे अविष्कार सादर करत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद घेत दोडामार्ग तालुक्याचे नाव महाराष्ट्रात नेले. किशोर सावंत यांच्या कलेची दखल घेत इंडियन आयडॉल या जगप्रसिद्ध सोनी टीव्हीवरील कार्यक्रमात किशोर सावंत यांना कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२८ जून रोजी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त किशोर सावंत यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावातील किशोर सावंत यांनी हास्य अभिनेता, तसेच जादू प्रयोग, लहान मोठया टि. व्ही सीरियल मालिकामध्ये भूमिका कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. इंडियन आयडॉल या सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रमात कला सादर करण्यासाठी ऑडिशन घेतले. यात त्यांच्या कलेला सोनी टिव्ही परिक्षकांनी भरभरून दाद दिली असून त्याच प्रक्षेपण २८ जून रोजी रात्री ८ वाजता सोनी टिव्हीवर होणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील या कलाकाराच संपूर्ण तालुक्यामधे कौतुक होत आहे. या अगोदर त्यानी महाराष्ट्राची हास्यजत्रा, पार्टनर अश्या बर्‍याच मराठी, हिंदी मालिकामधे देखील सहभाग घेतला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg