loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीदेव विठ्ठल रखुमाई सांस्कृतिक मंडळ, कुडली मोडा राबवणार अभिनव उपक्रम

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - कुडली गावाचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आर्थिक असा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने "श्रीदेव विठ्ठल रखुमाई सांस्कृतिक मंडळ कुडली मोडा" (नोंदणीकृत) मंडळाची स्थापना दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी झाली. त्यानंतर मंडळाच्यावतीने पहिलाच अभिनव उपक्रम दि.5 जुलै 2026 रोजी हाती घेण्यात आला आहे. जमिनीची धूप थांबावी, भूगर्भजल पातळी वाढावी, पर्यावरण व मानवी आरोग्य रक्षण व्हावे यासाठी जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारे, सावली देणारे दुर्मिळ होत चाललेले वृक्ष यांच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये, कदंब, सुरंगी, कवठ, वड, पिंपळ, करंज, बहावा, ताम्हण, कांचन, बदाम, काशिद, बेहडा, बकुळ, जांभूळ, चिंच, कडुलिंब, अशोक, इ.पर्यावरणरक्षक रोपांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमास संपूर्ण व्यवस्थापक मंडळ गावातील पुरुष व महिला मंडळ, क्रीडा मंडळ यांच्याकडून आर्थिक, वस्तूरूप व शारीरिक (श्रमदान) योगदान मिळत आहे. या अभिनव उपक्रमाची चर्चा संपूर्ण कुडली गाव व पंचक्रोशीत होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg