लांजा (संजय साळवी) - नगरपंचायतीच्यावतीने लांजा शहरात अनधिकृत खोके हटाव मोहीम राबविण्यात आली. नगरपंचायतीमधील कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील सततची वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना चालताना होणारा त्रास, जागा नसल्याने पार्किंगची होणारी गैरसोय, उड्डाणपुलाखाली अस्ताव्यस्त खोके लावण्यात आल्याने शहराचे झालेले विद्रुपीकरण या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतीच्यावतीने बुधवारी २९ एप्रिल रोजी शहरात अनधिकृत खोके हटाव मोहीम राबविण्यात आली. नगरपंचायतीच्या कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी संतोष आग्रे, संजय गुरव, रवींद्र कांबळे तसेच अन्य सफाई कर्मचारी यांच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान शहरातील उड्डाणपुलाखालील अस्ताव्यस्त लावण्यात आलेले बंद अवस्थेतील खोके हटविण्यात आले. या खोकेधारकांना यापूर्वी नोटीस देवूनही त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच अस्ताव्यस्त चालू अवस्थेतील खोकेधारकांना एका सरळ रेषेत खोके लावण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नगरपंचायतीच्या या धडक कारवाईमुळे शहराला आलेले विद्रुपीकरण कमी होण्यास मदत होणार असल्याने नागरिकांकडून नगरपंचायतीच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.








































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.