सावंतवाडी (प्रतिनिधी) - येत्या दोन वर्षांचा काळ आपल्यासाठी महत्त्वाचा असून या काळात शिवसेना संघटना अधिक जोमाने बांधूया. यापुढे संघटनेत तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाईल, असे आश्वासन शिवसेना (उबाठा) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिकांना दिले. बुधवारी जिल्हाप्रमुख पदाची धुरा स्वीकारल्यानंतर वैभव नाईक यांनी सावंतवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला प्रथमच भेट दिली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि मोठ्या जल्लोषात स्वागत केले. उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वैभव नाईक म्हणाले की, "यापुढे संघटनेचे प्रत्येक काम सर्वांना विश्वासात घेऊनच केले जाईल. जे जुने कार्यकर्ते काही कारणास्तव प्रवाहाबाहेर गेले आहेत, त्यांना पुन्हा एकत्र आणून संघटना अधिक मजबूत करण्यावर आमचा भर असेल. लवकरच जिल्ह्यातील प्रत्येक विभागात बैठका घेतल्या जातील आणि शिवसैनिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील."
बागायती, शेतीचे नुकसान करणाऱ्या जंगली हत्तींच्या प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. लवकरच 'हत्ती हटाव' मोहिमेसाठी मोठे आंदोलन छेडले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बाळा गावडे, चंद्रकांत कासार, निशांत तोरसकर, रमेश गावकर आणि राजू शेटकर यांनीही आपले विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, राजू शेटकर, बाळा गावडे, रमेश गावकर, शैलेश गावंडळकर, सीमा मठकर, नम्रता झारापकर, श्रृतिका दळवी, रमेश सावंत, शब्बीर मणियार, फिलीप्स रॉडिक्स, साई काणेकर, आबा केरकर, विनोद काजरेकर, प्रशांत बुगडे, निशिकांत तोरसकर, आशिष सुभेदार, प्रमोद सावंत, समीरा खलील, उदय अळवणी, गोकुळदास मोटे, वाडकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.