loader
Breaking News
Breaking News
Foto

राजीवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा; प्रगती शिर्के सरपंचपदी विजयी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत राजीवली येथे झालेल्या सरपंच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपला झेंडा फडकावला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रगती शिर्के यांनी विजय मिळवत सरपंचपदावर विराजमान होण्याचा मान मिळवला. ही निवडणूक भाजप नेते तसेच प्रसिद्ध उद्योजक सूर्यकांत साळुंखे आणि तालुका अध्यक्ष विनोद म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करत विजय निश्चित केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणुकीत दोन्ही गटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर प्रगती शिर्के यांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजय मिळवला. त्यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाके फोडले आणि आनंद व्यक्त केला. पुढील काळात गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रगती शिर्के यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg