loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात खेवरा सर्कल येथे सोनसाखळी खेचून दुचाकीवरील चोरट्यांचा पोबारा

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यात मानपाडा परिसरात रात्रीचे जेवण करून फेरफटका मारणाऱ्या २७ वर्षीय तक्रारदार विनीत पांडे यांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरील दुकलीने खेचून पोबारा केल्याची घटना २७ एप्रिल रोजी रात्री १०-३० वाजण्याच्या सुमारास घडली. चितळसर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारदार विनीत पांडे(३७) रा. मानपाडा हे सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास जेवण केल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी खेवरा सर्कल येथे पायी फिरत असताना सार्वजनिक रस्त्यावर मागून आलेल्या दुचाकीवरील दुकलीने तक्रारदार यांच्या गळ्यातील ८५ हजाराची सोनसाखळी खेचून धूमस्टाईलने हॅप्पी व्हॅलीच्या दिशेने पोबारा केला. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात दोघं अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg