loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये बंद बंगला फोडून १२ लाखांचे दागिने लंपास

खेड (प्रतिनिधी )- खेड शहरातील शिवसमर्थनगर येथील महेंद्र शिरगांवकर यांच्या मालकीचा बंगला फोडून कपाटातील अंदाजे ७ तोळे वजनाच्या १२ लाखांच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही चोरीची घटना १८ एप्रिल रोजी घडल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महेंद्र शिरगांवकर हे पत्नीसमवेत भावाच्या मुलाच्या विवाहाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी पुणे येथील नातेवाईकांकडे गेले होते. त्यांच्या मालकीचा 'जिव्हाळा' बंगला बंद असल्याचे हेरून चोरट्याने तळमजल्यावरील कपाटातील ४० हजार रुपयांची रोकड व पहिल्या मजल्यावरील असलेल्या बेडरुमच्या कपाटातील ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १ लाख रुपये किंमतीची चांदीची भांडी लंपास केली.

टाईम्स स्पेशल

शिरगांवकर यांच्या बंगल्यात काम करण्यासाठी मोलकरीण आली असता बंगला फोडल्याचे निदर्शनास आले. ही बाब शिरगांवकर कुटुंबियांना कळवल्यानंतर त्यांच्या कन्येने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्याचा माग काढण्यात श्वानपथकास अपयश आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg