loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात "हिट एन्ड रण" भरपाई मागणाऱ्यास कार ने उडवून फरार

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्याच्या घोडबंदर रोडवर कॅपिटल हॉटेलजवळ एका व्यावसायिक कारने तक्रारदार आदित्य पाटील यांच्या कारला धडक दिली. नुकसान भरपाई देण्यास नकार देत कार घेऊन पळताना तक्रारदार याना कारने उडवून कार चालकाने पोबारा केल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री ८-४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात तक्रारदार जखमी झाले असून त्यांना उपचार सुविधा न देताच पळून गेल्याने व्यावसायिक कारचालकाच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार आदित्य मनोहर पाटील(३६) रा. कापूरबावडी यांच्या कारला एका व्यवसायिक वेंगेनर कारने मागून दिलेल्या धडकेत झालेले नुकसान भरून देण्यासाठी गॅरेजवर गेल्यानंतर भरपाई न देण्याच्या मनस्थितीत असलेल्या वेंगेनर चालकाने कारसह पळून जाण्याच्या प्रयत्न केल्यानंतर त्तक्रारदार यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर वेंगेनर चालकाने आदित्य पाटील याना कारने उडवून बॉनेटवर फरफटत नेले. कारने ब्रेक मारल्यानंतर पाटील हे खाली पडले त्यांच्या पायावरून कार नेवून जखमी केले. जखमी तक्रारदाराला उपचार सुविधा देण्याऐवजी वेंगेनर कार चालक फरार झाला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात वेंगेनर कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कापूरबावडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg