loader
Breaking News
Breaking News
Foto

"गो सन्मान आवाहन अभियान"अंतर्गत गो भक्तांकडून गुहागर तहसीलदारांना निवेदन

वरवेली (गणेश किर्वे) - देशभरात गोसंवर्धन व गोसंरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या "गो सन्मान आवाहन अभियान" अंतर्गत गुहागर तालुक्यातील गो भक्त यांच्याकडून गुहागर तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. भारत देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांना पाठविण्यात आलेल्या या निवेदनामध्ये भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करत केंद्र शासनाने ठोस धोरणात्मक व पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संस्कृतीत गोमाता ही श्रद्धेचे व जीवनपद्धतीचे केंद्र मानली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि पर्यावरणीय संतुलन यामध्ये गायींचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सध्याच्या काळात भू-जल प्रदूषण, कत्तल आणि अन्य कारणांमुळे गोवंशावर संकट निर्माण होत असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी एकसमान राष्ट्रीय धोरणाची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. गोवंशाच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात गोसंवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, गोवंश कत्तल प्रतिबंधासाठी कठोर अंमलबजावणी करणे आणि गोसंरक्षणाला कायदेशीर बळ देणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनात पुढे गोवंशाला विधीमान्यतेचा दर्जा द्यावा, तसेच गोसंवर्धन आणि संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय गोवंश मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामुळे देशभरात एकसमान धोरण राबविणे सुलभ होईल आणि गोवंशाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल, असे मत मांडण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

गायीला राष्ट्रमाता, राष्ट्रीय देवी, राष्ट्रीयपूजा, वारसा किंवा राष्ट्रीय पाया असा सन्माननीय दर्जा देण्यात यावा, गायीचा आदर केला पाहिजे, तो सेवेसाठी केंद्रीय कायदा बनवावा आणि दोन सेवेसाठी एक केंद्रीय मंत्रालय स्थापन करावे जेणेकरून संपूर्ण भारतात गो सेवा समान रीतीने करता येईल, गोचर बोर्ड स्थापन करणे चारा सुरक्षा धोरण स्थापन करावे व आधारित शेती व निश्चित करावी आणि पंच गव्य उत्पादनाचे उत्पादन व वितरण वाढवावे, या गो सन्मान आवाहन अभियानामध्ये तालुक्यातील सर्वच गो भक्त सामील झाले आहेत. निवेदन देताना गो भक्त श्रीराम विचारे, गजानन दीक्षित, उमेश खैर, गणेश किर्वे, नथुराम हरचिलकर व गोरक्षक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg