loader
Breaking News
Breaking News
Foto

नाणोस ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र जोशी विजयी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील नाणोस ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी झालेल्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र भाऊराव जोशी यांनी ५८ मताधिक्य मिळवून शानदार विजय संपादन केला आहे. या विजयामुळे नाणोस परिसरात शिवसेना समर्थकांनी जल्लोष केला. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी रवींद्र जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी जोशी यांच्या विजयाने संघटनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असल्याचे सांगत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​याप्रसंगी संजय जोशी, रघुनाथ जोशी, ज्ञानदेव जोशी, अनिश जोशी यांच्यासह नाणोस ग्रामपंचायतीचे अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवींद्र जोशी यांच्या विजयामुळे ग्रामपंचायत स्तरावर शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाली असून, गावाच्या विकासकामांना आता अधिक गती मिळेल, असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg