loader
Breaking News
Breaking News
Foto

शिपोशी बौद्धवाडी ते कुरूपवाडी मार्गावरील भव्य पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील शिपोशी बौद्धवाडी ते कुरूपवाडी या मार्गावरील हरिहरेश्वर मंदिराजवळ शास्त्री नदीच्या पात्रात भव्य पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे ४.५२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे शिपोशी, सालपे आणि कुरचुंब या गावांतील अंदाजे ३ हजार ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यांच्यासाठी हा मार्ग प्रगतीची नवी दिशा ठरणार आहे. ​या पुलाचे एकूण अंदाजपत्रक ४.५२ कोटी रुपये आहे. आतापर्यंत सुमारे १.५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पुलाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या प्रगतीवर आहे. ६० मीटर लांबी आणि ७.५ मीटर रुंदी असलेल्या या पुलामध्ये २० मीटरचे तीन गाळे असणार आहेत. सद्यस्थितीत पुलाच्या एक खांब आणि दोन पीअरचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या अब्युटमेंटचे आणि एका स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे. ​सध्या शिपोशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांना मुख्य बाजारपेठ, ग्रामपंचायत किंवा सरस्वती विद्यालयात जाण्यासाठी लांबचा वळसा घ्यावा लागतो. या पुलामुळे हे अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. विशेषतः पावसामुळे निर्माण होणारी अडचण दूर होऊन ग्रामस्थांना थेट संपर्क साधणे सोपे जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​​या पुलाचा सर्वाधिक फायदा शिपोशी बौद्धवाडी, कुरचुंब व सालपे या गावांना होणार आहे. ग्रामपंचायत, शाळा आणि बाजारपेठेशी थेट संपर्क येणार आहे. प्रवाशांसाठी हा मार्ग अत्यंत जवळचा ठरणार आहे. हा रस्ता पुढे कुरूपवाडीमार्गे राज्य महामार्ग १७५ ला मिळत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणांशी संपर्क अधिक वेगवान होईल. ​या पुलाच्या कामामुळे परिसरातील शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले हे काम पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त पूर्ण करण्याकडे प्रशासनाचा कल आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg