खेड (प्रतिनिधी) - कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी विविध नवीन गाड्या सुरू करण्याची आणि पायाभूत सुविधा सुधारण्याची मागणी कोकण विकास समितीने खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. यामध्ये रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत करतानाच मुंबई आणि रत्नागिरीदरम्यान नवीन गाडी सुरू करावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. कोकणातील रेल्वेप्रवाशांच्या विविध प्रलंबित समस्यांवर सखोल चर्चा केली आणि त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या वेळी खासदार तटकरे यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत, सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्राधान्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. या निवेदनात कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी विविध नवीन गाड्या सुरू करण्याची आणि पायाभूत सुविधा सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत सुरू करणे अथवा मुंबई आणि रत्नागिरीदरम्यान, मुंबई-चिपळूणदरम्यान नवीन गाडी सुरू करणे, आणि मडगाव-बांद्रे एक्स्प्रेस नियमित करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. तसेच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला २० डब्यांचा रेक उपलब्ध करून द्यावा आणि महाड तालुक्यातील करंजाडी येथे काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती विशेष गाड्यांचे योग्य नियोजन करण्याबाबतही या वेळी सविस्तर चर्चा झाली.
शिष्टमंडळाने कोकण रेल्वेच्या काही दीर्घकालीन आणि धोरणात्मक प्रश्नांवरही खासदारांचे लक्ष वेधले. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत संपूर्ण विलिनीकरण करावे, संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण करण्यात यावे आणि कोकण रेल्वेमार्गावरील प्रवासी भाड्यावर आकारण्यात येणारा ४० टक्के अतिरिक्त अधिभार त्वरित रद्द करण्यात यावा, या मागण्यांचा यात समावेश आहे. तसेच खेड तालुक्यातील दिवाणखवटी स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी उंच फलाट बांधण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर, अक्षय महापदी, विजय मोरे आणि प्रशांत दरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.







2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.