loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा महाविद्यालयाच्या कला शाखेची अझमीना नेवरेकर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर): न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजा संचलित लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कला शाखेच्या इंग्रजी विभागात अझमीना अल्लाउद्दीन नेवरेकर हिने उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अझमीना ही अभ्यासाबरोबरच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असते. मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवात मेहंदी डिझायनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत तिने विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

टाईम्स स्पेशल

तिच्या सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. अझमीना हिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच कुटुंबीय यांच कडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg