loader
Breaking News
Breaking News
Foto

साई युवा संघ व साई बाबा ग्रामस्थ मंडळ खोरनिनको आयोजित क्रिकेट स्पर्धेत पी.एम.वॉरिअर खोरनिनको संघ विजयी

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - साई युवा संघ व साई बाबा ग्रामस्थ मंडळ, खोरनिनको यांच्या वतीने आयोजित भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा पर्व ३ मोठया उत्साहात नुकत्याच पार पडली. यामध्ये पी.एम. वॉरिअर खोरनिनको संघ प्रथम मानाचा मानकरी तर, प्रभानवल्ली सुपरस्टार दुसरा क्रमांकाचा मानकरी ठरला. मालिकावीर म्हणून भरत गुरव (संघ -पी.एम. वॉरिअर खोरनिनको) याची निवड झाली व त्याला ट्रॉफी व सायकल देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज वैभव पांचाळ (संघ -पी.एम. वॉरिअर खोरनिनकोे) याला कुलर व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज मयुर गुरव (संघ-प्रभानवल्ली सुपरस्टार) याला कुलर व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुजित प्रभुलकर याला शूज व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच युवा खेळाडू व उदयमुख खेळाडू म्हणून सक्षम भरीष्टे याला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे पंच म्हणून भरत गुरव, वैभव पांचाळ, प्रणित सावंत, प्रकाश सावंत, प्रमोद सावंत, गौरव गुरव व नामदेव सोलकर यांनी उत्तम कामगिरी बजावली. गुणलेखक म्हणून रुपेश यादव, शरद गुरव व रविंद्र भातडे यांनी जबाबदारी सांभाळली. समालोचक म्हणून सलमान फकीर व संतोष गुरव यांनी उत्कृष्ट काम केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साई युवा संघाच्या प्रत्येक सदस्याने दिवस-रात्र विशेष मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg