loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशीत फणसाच्या तळलेल्या गऱ्यांना मागणी

केळशी (मंगेश पाटील) - कोकणचा आंबा, फणस म्हटलं की त्याची चव जिभेवर रेंगाळतेच. तसेच फणसाच्या तळलेल्या गरांची मागणी जोरदार असते. यंदा एप्रिल मे महिन्याच्या हंगामात सुट्ट्या आणि लग्नसराई एकत्र आल्याने तळलेल्या गरांना प्रचंड मागणी आहे. मात्र खोबरेल तेलाच्या दरवाढीचा थेट फटका या गरांच्या किमतीला बसला असून 800 ते 1000 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. उन्हाळी सुट्टी व चाकरमानी मुंबई पुण्यातून गावी आल्याने चाकरमान्यांची पहिली पसंती तळलेल्या गरांना मोठी पसंती मिळत आहे. परत जाताना सोबत नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लग्नसराईचा हंगाम मे महिन्यात कोकणात लग्नाचा धडाका पाहुण्यांच्या ताटात आणि रुखवतामध्ये तळलेले घरे मानाचा पदार्थ असतो. स्थानिकांची वाढती पसंती मोठ्या प्रमाणात या फणसाच्या गरांना आहे. पूर्वी फक्त मुंबईला पाठवायचे म्हणून घरी तळले जायचे. आता मात्र स्थानिक कुटुंबे ही आवडीने खातात व केळशी बाजारपेठेत सकाळपासून गरांना खरेदीसाठी गर्दी दिसते. खोबरेल तेल महाग झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत खोबरेल तेल 30 ते 40 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे तळलेले गरे पारंपारिक पद्धतीने खोबरेल तेलातच तळले जातात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. गॅस दरवाढ, लाकूड आणि मजुरीचे दरही वाढलेले आहेत. उत्तम फणसाची टंचाई कापा माणसाचे जाड व मऊ कमी तंतू असलेले गरे मिळणे कठीण झाली आहे.

टाईम्स स्पेशल

त्यामुळे चांगल्या प्रतीच्या गरांना वेगळा भाव मिळतो. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फणसाचा हंगाम टिकेल पावसाला सुरुवात झाली की फणस गरे तळणे बंद होते त्यामुळे मे अखेरपर्यंत दर तेजित राहतील, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे. चवीपलीकडील अर्थकारण : तळलेल्या गरांच्या विक्रीमुळे कोकणातील अनेक महिला बचत गटांना आणि घरगुती उद्योजकांना हंगामी रोजगार मिळालेला आहे. एक किलो गरामागे 300 ते 400 रुपये नफा मिळतो. त्यामुळे महागाई असली तरी हा पारंपरिक उद्योग कोकणची अर्थव्यवस्था बदलतो आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg