loader
Breaking News
Breaking News
Foto

धाकोरे शाळा नंबर 1 मध्ये सहज योग शिबिर संपन्न

आजची बदलती जीवनशैली व मोबाईलच्या जमान्यात मुलांना एकाग्रता वाढीस लावणे अभ्यासात सातत्य टिकवणे, खेळाविषयी व योगा विषयी आवड निर्माण व्हावी म्हणून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धाकोरे नं १ येथे सहज योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन वर्गासाठी डॉक्टर बुरुड, अमृता कदम, सोनाली कांबळी, शेखर कांबळी व कुंभार यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी योगसाधना प्राणायाम व आपल्यातील कुंडलिनी शक्ती जागृत करणे व त्याचा जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल याबाबत प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी मुलांकडून व उपस्थित पालक वर्गाने ध्यानसाधना केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्राणायाम योग्य प्रकारे कसे करावे, श्वासावर नियंत्रण कसे ठेवावे यावर अमृता कदम यांनी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर व ज्येष्ठ नागरिक सदगुरु मुळीक यांनी केले. तर शाळेचे सहाय्यक शिक्षक सोनल जाधव यांनी आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg