loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्ग टोलवर किरण सामंतांचा इशारा; भूसंपादनाचे पैसे द्या, नाहीतर टोल सुरू होऊ देणार नाही!

लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी मुंबई-गोवा चौपदरी महामार्गावरील टोल प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. भूसंपादन झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना संपूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय हातीवले येथील टोल नाका सुरू होऊ देणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला. स्थानिक जनतेवर अन्याय सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत किरण सामंत यांनी स्थानिक वाहनधारकांना टोलमाफी देण्याची जोरदार मागणी केली. महामार्गासाठी जमीन दिलेल्या लोकांकडूनच पुन्हा टोल वसूल करणे हा अन्याय असल्याचे त्यांनी सुनावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी नाणार परिसरात प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. “आमचा आंबा संपवणारा कोणताही प्रकल्प आम्ही सहन करणार नाही. कोकणच्या बागायतीवर घाला घालणाऱ्या प्रकल्पाला आमचा ठाम विरोध राहील,” अशी रोकठोक भूमिका त्यांनी मांडली. भैया सामंत यांच्या या भूमिकेमुळे महामार्ग टोल, भूसंपादन आणि बॉक्साईट प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg