loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली येथील श्री संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिरात १ मे रोजी 'साक्षात्कार दिन सोहळा'

सावंतवाडी (प्रतिनिधी) - इन्सुली येथील श्री संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर येथे शुक्रवार, १ मे रोजी 'साक्षात्कार दिन सोहळा' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवारी पहाटे ६ वाजता काकड आरतीने उत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ८:३० वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक आणि ९:३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होईल. दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ​संध्याकाळच्या सत्रात ५ वाजता सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ७ ते ८:३० या वेळेत श्रींची पालखी सोहळा भव्य स्वरूपात काढली जाईल. उत्सवाची सांगता रात्री ९:३० वाजता 'आजगांवकर दशावतार नाट्यमंडळ, आजगांव' यांच्या 'तिरुपती बालाजी' या दिमाखदार दशावतारी नाट्यप्रयोगाने होणार आहे.

टाइम्स स्पेशल

या सुवर्ण संधीचा लाभ सर्व भाविकांनी आणि नाट्य रसिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री संत सोहिरोबानाथ सेवा समिती इन्सुली, उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ आणि सर्व नाथभक्तांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg