loader
Breaking News
Breaking News
Foto

​महावितरणच्या 'स्मार्ट' मीटर विरोधात तेरवण ग्रामस्थांचा आक्रोश; १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - महावितरणच्या मनमानी कारभाराचा फटका सावंतवाडी तालुक्यातील तेरवण येथील ग्रामस्थांना बसला असून, या विरोधात ग्रामस्थांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. घरात कोणी नसताना गुपचूप स्मार्ट मीटर बसवल्याने एका कुटुंबावर दोन दिवस अंधारात राहण्याची वेळ आली आहे. या प्रकाराचा निषेध म्हणून १ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मिळालेल्या माहितीनुसार, तेरवण येथील सोमनाथ अर्जुन गवस यांच्या घरी कोणी नसताना महावितरणने स्मार्ट मीटर बसवला. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांनी विचारणा केली असता, "आधी बिल भरा मग पंधरा मिनिटात लाईट सुरू होईल" असे सांगण्यात आले. मात्र, दोन दिवस उलटूनही गवस यांच्या घरात अंधारच होता. विशेष म्हणजे, तेरवण गावात कोणत्याही कंपनीचे मोबाईल नेटवर्क किंवा टॉवर नाही, अशा परिस्थितीत महावितरणने स्मार्ट मीटर का बसवला, असा सवाल गावकरी विचारत आहेत.

टाइम्स स्पेशल

जोपर्यंत लावलेला स्मार्ट मीटर काढून दुसरा मीटर बसवला जात नाही, तोपर्यंत उपोषणाच्या जागेवरून हलणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. या उपोषणाला विजय खेमाजी गवस, सदाशिव गवस, विजय विठ्ठल गवस, तुकाराम नारायण गवस, मंगल शांताराम गवस, शांती गवस, अजय नाईक, मंगल शंकर गवस, सचिन सोमा गवस, मोहन सावंत, ऋतुजा सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg