सावंतवाडी (प्रतिनिधी) : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने झालेल्या आर्थिक व्यवहारातून सावंतवाडी येथील सर्वोदय नगर परिसरात मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ठाणे येथेही त्याच्यावर गुंतवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल असून, तेथील पोलीस तपासासाठी त्याचा ताबा मिळण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. पुणे येथील काही व्यक्तींनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सागर कारिवडेकर याला मोठी रक्कम दिली होती. मात्र, परतावा किंवा मुद्दल मिळत नसल्याने संबंधितांनी पैशांच्या मागणीसाठी सावंतवाडी गाठली होती. त्यावेळी सर्वोदय नगर परिसरात त्यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सागर कारिवडेकर फरार होता.
गेल्या पाच महिन्यांपासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. अखेर तो कारिवडे या आपल्या मूळ गावी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गावात सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने अटक केली. सुरुवातीला त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर कारिवडेकरला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान, ठाणे येथेही त्याच्याविरुद्ध शेअर बाजारातील गुंतवणुकीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. त्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ठाणे पोलीस न्यायालयाकडे त्याच्या ताब्याची मागणी करण्याची विनंती करतील, अशी माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली आहे.


















































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.