रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कल्पकतेतून उभारण्यात आलेला १ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वी ठरताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२४ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या काळात या प्रकल्पातून तब्बल १६ लाख ३३ हजारांहून अधिक युनिटची निर्मिती झाली आहे. त्यातून ६८ लाख ६९ हजार ६७० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या उत्पन्नाचा वापर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या थकीत आणि चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील 'स्ट्रीट लाईट'च्या (पथदीपांचे) बिलाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
गोळप येथील हा सौर ऊर्जा प्रकल्प सुमारे ८ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या देखभालीची आणि दुरुस्तीची जबाबदारी पुढील ५ वर्षांसाठी संबंधित एजन्सीकडे निश्चित करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींना दरमहा अंदाजे १५ लाख रुपये पथदीपांचे वीजबिल येते. अनेकदा निधीअभावी ही बिले थकीत राहतात आणि गाव अंधारात जाण्याची भीती असते. मात्र, गोळप प्रकल्पातून मिळणारी रक्कम थेट या ग्रामपंचायतींच्या वीज देयकांसाठी वितरित करण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतींचे वीजबिल थेट शासनाकडून भरले जाते, त्या वगळून उर्वरित सर्व ग्रामपंचायतींना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे.
तालुक्यातील सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचा हा प्रयोग कोकणात पथदर्शक ठरत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या तिजोरीवरील ताण कमी होणार आहे. नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून शाश्वत विकासाचे ध्येय गाठले जात आहे. ५ वर्षांच्या देखभाल-दुरुस्ती करारामुळे तांत्रिक अडचणींचा धोकाही कमी झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. गोळप येथील सोलर प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या वीजबिलांचा प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. हा प्रकल्प ग्रामीण विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.


















































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.