ठाणे (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबाविरोधात ठाणे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त करत जोरदार आंदोलन छेडले. “शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही,” असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात मंचावर उपस्थित असूनही कोणताही विरोध न दर्शवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही काँग्रेसने थेट निशाणा साधत त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, ठाणे येथे संतप्त निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी कडक इशारा दिला की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वरसारख्या भोंदूला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.” काँग्रेसच्या वतीने बागेश्वर बाबाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची, तसेच त्याच्या महाराष्ट्र प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची जोरदार मागणी करण्यात आली. “शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभं करेल,” असा इशाराही देण्यात आला. आंदोलनादरम्यान ‘भोंदू बाबा बागेश्वर हाय हाय’, ‘भाजप सरकार होश में आओ’, ‘शिवरायांचा अपमान चालणार नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, प्रदेश पदाधिकारी राजेश जाधव, महिला अध्यक्ष स्मिता वैती, वैशाली भोसले, मीनाक्षी थोरात, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, एस सी विभागाचे अध्यक्ष उमेश कांबळे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, दयानंद एंगडे, स्वप्निल कोळी, निलेश शेंडकर, महेश पाटील, लोकेश घोलप, स्वप्निल भोईर, प्रभात झा, सागर लबडे, निशिकांत कोळी, शिरीष घरात, राजू शेट्टी, सुरेश भोईर, अब्बास भाई, सुभाष ठोंबरे, शहर काँग्रेस पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.