सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय पदे भरण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणेचा दर्जा सुधारण्यासाठी विदर्भ व मराठवाड्याच्या धर्तीवर जिल्ह्याला विशेष दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै. सभागृहात आयोजित 'जनता आरोग्य दरबारात' ते बोलत होते. आमदार केसरकर म्हणाले की, जिल्ह्यात ५० टक्के डॉक्टरांची कमतरता आहे. सावंतवाडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाच्या निधीतून डॉक्टरांना अतिरिक्त पगार देऊन त्यांची नेमणूक करता येईल, असा प्रस्ताव पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसेच, उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सुविधेवर भर देत, आमदार निधीतून आणखी दोन डायलिसिस युनिट्ससाठी तात्काळ पत्र दिले असल्याचे त्यांनी जाहीर केले. गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलबाबत बोलताना केसरकर यांनी सांगितले की, सरकार आणि राजघराण्याकडून जागेबाबत निर्णय झाला असून केवळ काही स्वाक्षऱ्या बाकी आहेत. येत्या आठवड्यात आरोग्य मंत्रालयात विशेष बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच, उपजिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन वास्तू उभारण्यासाठी बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जागेअभावी उपजिल्हा रुग्णालयात 'आयुष'ची ओपीडी सुरू करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेच्या इमारतीत ही ओपीडी सुरू करण्यासाठी नगराध्यक्षांशी चर्चा झाली असून, लवकरच ती कार्यान्वित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटींचा निधी मंजूर असतानाही कामाच्या संथ गतीबद्दल केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. "कंत्राटदार लॉबी कामे वेळेत पूर्ण करत नाही," असा आरोप करत रुग्णालयात पेस्ट कंट्रोल करण्याच्या सूचनाही त्यांनी बांधकाम विभागाला दिल्या. या आरोग्य दरबाराला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, समन्वयक एन.बी. रेडकर, डॉ. धनंजय काकडे, डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रा. सुभाष गोवेकर, नगरपरिषद आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर, सभापती प्रतिक बांदेकर,बाल कल्याण समिती सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका मोहिनी मडगावकर, अँड ओंकार तुळसुलकर, रवी जाधव, अँड नंदन वेंगुर्लेकर, शेखर सामंत, विनोद शेंडे, शकुंतला भालेराव, रवींद्र ओगले व मान्यवर उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयआणि ग्रामीण दौऱ्याच्या वेळी उपकेंद्रांना भेट देण्याचा मानस आमदार केसरकर यांनी व्यक्त केला ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० टक्के डॉक्टरांची कमतरता आहे ती भरण्यासाठी तसा दर्जा दिला जावा बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जा देण्यासाठी आपण आरोग्यमंत्र्यांनी खासबाब म्हणून प्रयत्न करावे यासाठी प्रयत्न करणार आहे. १०८ रुग्णवाहिकेबाबत लक्ष देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. धनंजय काकडे, डॉ. जयेंद्र परुळेकर,आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, जनता आरोग्य दरबाराचे समन्वयक एन बी रेडकर व मान्यवरांनी यावेळी विचार मांडले.


















































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.