दापोली : वराडकर-बेलोसे कनिष्ठ महाविद्यालय, दापोली येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिन तसेच अमली पदार्थ विरोधी दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. बी. बी. ढवळे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एल. पी. पाटील होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून व्यसनमुक्त आणि सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. प्रमुख व्याख्याते एस. एस. पैठणे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक सुधारणांचा वारसा, सामाजिक न्यायाचे महत्त्व आणि अमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनामुळे युवकांच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर विवेचन केले. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजसेवा यांना प्राधान्य द्यावे, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी कोवळे यांनी प्रभावीपणे केले, तर समृद्धी खताते यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक दिनेश होडबे तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेची जाणीव, व्यसनमुक्त जीवनाचा संदेश आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभावी प्रसार झाला.
















2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.