loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड आरोग्य वर्धिनी केंद्रांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कुंबळेत आरोग्य वर्धिनी रिफ्रेशर प्रशिक्षण संपन्न

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) कार्यक्रमांतर्गत, आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कुंबळे येथे रिफ्रेशर ट्रेनिंग चे आयोजन करण्यात आले होते. या रिफ्रेशर ट्रेनिंगला मंडणगड तालुक्यातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त उपस्थितीचा प्रतिसाद दिल्याने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम चांगलाच सफल झाला. मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशा कार्यक्रमाचे उद्घाटन मंडणगड पंचायत समितीचे उपसभापती दिपक मालुसरे, यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, DRCHO डॉ. माधव ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे उपस्थित होते. जिल्हा प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी यांच्याद्वारे आयोजित या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि ज्ञान अद्यावत करणे हा होता. या प्रशिक्षण सत्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका यांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षणादरम्यान जिल्हास्तरावरून आलेल्या तज्ञ प्रशिक्षकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिक डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी यांनी केले.

टाईम्स स्पेशल

सदर प्रशिक्षणात जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरण काठोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नगमा बलबळे, स्त्रीरोग तज्ञ डॉ साळुखे, माणसरोग तज्ञ डॉ अवघडे यांनी सर्व कर्मचारी व अधिका-यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधत प्रशिक्षणादरम्यान सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कुंबळे येथे वृक्षारोपणाचा सामाजिक कार्यक्रम करत आपल्या सामाजिक बांधिलकीचे दायित्व देखील दाखवून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg