loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी किनारा मोहल्ल्यात मोहरम निमित्ताने काढण्यात आलेली ताजियाची मिरवणूक उत्साहात

दापोली (प्रतिनिधी) : मुस्लिम धर्मियांच्या मोहरम या धार्मिक कार्यक्रमानिमित्त केळशी येथील किनारा मोहल्ल्याने काढलेली ताजीयाची मिरवणुक शांततेत पार पड़ली. मुस्लिम धर्मियांचा मोहरम कार्यक्रम उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी येथील धार्मिक आणि सामाजिक कामांमध्ये नेहमीच सक्रिय असणाऱ्या मकबूल दिनवारे, त्याचप्रमाणे जहुर झोंबडकर या मुस्लिम धर्मिय नेत्यांनी उत्तम सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालूक्यातील केळशी येथील किनारा मोहल्ल्यातील मुस्लिम धर्मियांनी मोहरम या धार्मिक कार्यक्रमानिमित्त पारंपारीक संदल अर्थात ताजियाची काढलेली मिरवणुक ही शिस्तबध्द पध्दतीने शांततेत पार पडली. या ताजिया मिरवणुकीत केळशी किनारा मोहल्ल्यातील जाकिर होडेकर, अजमत चाऊस, इलियास चाऊस, मलिक खमसे, फैय्याज बोरकर, अमानुल्ला बोरकर, अबास दर्वेश, हुसेन चाऊस, अलि खमसे, बशीर खमसे, हमिद बोरकर, अन्वर चाऊस, मुसादिक चाऊस आदी प्रमुख या उत्सव मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

ताजिया मिरवणूक आणि एकुणच मोहरमच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची धार्मिक तेढ निर्माण होवू नये यासाठी दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आडे बिट पोलिस आउट पोस्टचे हेड कॉन्स्टेबल राजू मोहीते यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होणारा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि अगदी उत्साहात मोहरम कार्यक्रम पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg