loader
Breaking News
Breaking News
Foto

शिपोशीतील लोखंडी साकव जीर्ण; तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील शिपोशी गावातील खामकरवाडीतील लोखंडी साकवाची दुरावस्था झाली आहे. जीर्ण झालेल्या साकवावरून ये-जा करणे अत्यंत धोकादायक बनले असल्याने साकावाची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परीषद बांधकाम विभाग लांजा यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. खामकरवाडी येथील लोखंडी साकव नादुरुस्त झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी, बॅक, ग्रामपंचायत कार्यालयात, दवाखान्यात जाण्यासाठी हा दैनंदिन कामासाठी येजा करण्याचा एकमेव मार्ग आहे. सद्यस्थितीत सदर साकव नादुरूस्त झाल्यामुळे साकवावरून ये-जा करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. गेली चार वर्ष या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात. मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता या साकवाची खुपच दुरावस्था झाली आहे. कधीही कोसळु शकतो अशी अवस्था या साकवाची झाली आहे त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

यंदाच्या पावसाळ्यात सदर साकवाची दुरुस्ती झाली नाही तर पावसाळ्यात वाडीचा गावाशी संपर्क तुटून मोठी गैरसोय निर्माण होण्याची शक्यता आहे. संबधित प्रशासनाने या समस्याचे गांभीर्य ओळखून पावसाळ्यात जीवीत हानी सारखी दुर्घटना टाळण्यासाठी शिपोशी खामकरवाडीतील असलेल्या नादुरुस्त साकवाची तातडीने पहाणी करून दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ अनिल महाडिक, अनंत महाडिक, संजय गवळी, लक्ष्मण कोटकर, सुरज कोटकर, दीपक खेडेकर, रुपेश कोटकर आदीसह ग्रामस्थांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg