loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर येथे ओव्हर आर्म क्रिकेटचा महासंग्राम 5 व 6 एप्रिल रोजी

वरवेली (गणेश किर्वे) : तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने राजापूर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने राजापूर, लांजा, साखरपा क्रिकेट प्रिमियर लिग यांच्यावतीने तेली समाजातील तरुणांना एकत्रित आणण्यासाठी राजापूर नगरीतील राजीव गांधी क्रिडांगण वरची पेठ राजापूर येथे शनिवार दि. 5 एप्रिल व रविवार दि. 6 एप्रिल 2025 रोजी ओव्हर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. करण्यात येणार आहे. या उद्घाटन समारंभात मधुकर शंकर टिळेकर (रत्ना. जिल्हा मध्य. बँक लि. रत्नागिरी संचालक), एकनाथ तेली (अध्यक्ष-महा. प्रांतिक तैलिक महासभा सिंधुदूर्ग, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टी), तुकाराम सहदेव तेली (जिल्हा अध्यक्ष-सिंधुदुर्ग), दिपक राऊत (कार्याध्यक्ष रत्नागिरी जिल्हा), डॉ. दिलीप पाखरे (रत्नागिरी तेली समाज सेवा संघ), कमलाकर शेलार (सल्लागार तेली समाज), मंदार विलास आडिवरेकर (उद्योजक-समाज बांधव), विद्याधर शिवराम राणे (अध्यक्ष-राजापूर ता. तेली समाज से. संघ), स्नेहा दिलीप रहाटे (अध्यक्षा महिला राजापूर तेली स. से. संघ), प्रकाश लांजेकर (अध्यक्ष-लांजा तेली समाज सेवा संघ) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये आठ संघानी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ रविवार दि.6 एप्रिल 2025 रोजी सायं. 5 वा. होणार असून या बक्षीस वितरण समारंभासाठी किरण सामंत आमदार राजापूर-लांजा-साखरपा वि. मतदार संघ, सतिश वैरागी अध्यक्ष, कोकण महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा, रघुवीर शेलार अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा तेली समाज, गणेश धोत्रे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र कोकण विभाग, बिपीन बंदरकर सचिव, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या क्रिकेट स्पर्धेचा सर्व समाज बांधव तसेच हितचिंतक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन राजापूर तालुका तेली समाजसेवा संघ अध्यक्ष विद्याधर राणे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg