रसायनी (राकेश खराडे) - रायगड अखिल आर्यावर्त संघ-आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष दिनेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली श्री महाकाल फार्म हाऊस, जु-नांदखी कांबे रोड येथे भव्य हिंदू जनजागृती सभा संपन्न झाली. राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन संस्थापक अध्यक्ष दिनेशदादा पाटील, कोकण प्रांत अध्यक्ष प्रसिध्दी विभाग राकेश खराडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत दिनेश दादा पाटील यांनी विविध विषयांवर परखड भाषण केले. हिंदूंनी वेळीच जागे होण्याची गरज आहे. "लव जिहादच्या वाढत्या घटनांवर दिनेशदादा पाटील यांनी संताप व्यक्त केला. "आपल्या मुलींना वाचवण्यासाठी प्रत्येक हिंदू घराने सतर्क राहिले पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
श्री मलंग गड हा मच्छिंद्रनाथांचा आहे. त्याच्या मुक्तीसाठी हिंदूंना सक्रिय व्हावे लागेल. सरकार हिंदुत्ववादी आहे मग बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आरतीसाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष प्रसिध्दी विभागाचे राकेश खराडे यांनी हिंदूंनी जागे होण्याची वेळ आल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय बजरंग दल कायदा हातात घेणार नाही पण कायदेशीर मार्गाने कारवाई केल्याशिवाय राहणार नाही." "आता प्रत्येक गावामध्ये अशी हिंदू धर्म जागृती सभा घेऊन समाज जागृती अभियान राबवण्यात येणार आहे," अशी घोषणा त्यांनी केली.
कार्यक्रमाचे आयोजक विशाल पाटील यांची ठाणे जिल्हा महामंत्री व पालघर जिल्हा पालक पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी राकेश खराडे - कोंकण प्रांत अध्यक्ष सोशल मीडिया प्रमुख, जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, संघटन मंत्री राजन टेकडीकर, जिल्हा मंत्री विशाल जैस्वाल, राकेश रायचुरा - भिंवडी शहर उपाध्यक्ष, यांच्यासह शेकडो हिंदू कार्यकर्ते उपस्थित होते.























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.