संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मॅट्रिमोनी साईट्सच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करून प्रेमाचे नाटक रचत त्यांची आर्थिक व भावनिक फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रे या अट्टल भामट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने तब्बल १४० हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आहे. आदर्श म्हात्रे हा मूळचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरातील रहिवासी असून यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर अनेक प्रकरणे दाखल आहेत. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरसह विविध शहरांत तो सक्रिय असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याविरुद्ध राज्यभरात १५ पेक्षा अधिक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस तपासानुसार आरोपीचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले असले तरी तो स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ, आयपीएस, आयएएस किंवा सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी असल्याचे सांगत महिलांचा विश्वास संपादन करत असे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मॅट्रिमोनी साईट्सवरून उच्चशिक्षित व नोकरी करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून तो प्रेमाचे नाटक रचत असे. विश्वास निर्माण झाल्यानंतर संबंधित महिलांच्या नावावर बँकांमधून लाखो रुपयांचे कर्ज काढणे किंवा पैसे उकळणे, अशी त्याची कार्यपद्धती होती. महिलांवर प्रभाव पाडण्यासाठी तो महागड्या वाहनांचा वापर करत असे, तसेच पंचतारांकित हॉटेल्समध्ये भेटी आयोजित करत होता.
या फसवणुकीला कंटाळून आतापर्यंत ११ महिला व तरुणींनी पोलिसांकडे अधिकृत तक्रारी दाखल केल्या आहेत. नवी मुंबईतील कारवाईनंतर डोंबिवलीतील एका पीडित तरुणीनेही धाडस दाखवत तक्रार दाखल केली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.