loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न

पनवेल : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खांदा कॉलनी शहर शाखेत आयोजित आढावा बैठक आणि स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम यांचा उपमानगर संघटक शिवाजी दांगट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल महानगर प्रमुख समाधान काशीद यांचे खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. शिवसैनिकांच्या उत्साहात आणि जल्लोषात हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीदरम्यान संघटनात्मक आढावा घेण्यात आला तसेच आगामी राजकीय आणि संघटनात्मक नियोजनावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपमानगर प्रमुख रामदास गोंधळी, उपशहर प्रमुख मामुलकर, होटकर, शहर प्रमुख सदानंद शिर्के, लीलाधर भोईर, संतोष जाधव, परब, संजीव गमरे, शिवाजी बंडगर, घाडगे मावशी यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थित शिवसैनिकांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg