loader
Breaking News
Breaking News
Foto

मोहोपाड्यात सतत विजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी असोसिएशनचे ठिय्या आंदोलन

रसायनी (राकेश खराडे) - सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेल्या व्यापारी असोसिएशनने सोमवारी मोहोपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यासमोर व्यापा-यांनी बाजारपेठ बंद ठेवून ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला व सर्वपक्षीयांनी पाठींबा दर्शविला. मोहोपाडा, नवीन पोसरी बाजारपेठ व परिसरात दिवसा आणि रात्रीही वारंवार वीज खंडित होत असल्याने प्रामुख्याने व्यापारी, हॉस्पिटल आणि छोटे व्यावसायिक (लाँड्री, रसवंती, दूध व्यापारी) यांना मनस्तापासह आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत असल्याने संतप्त विज ग्राहकांनी अनेकदा मोहोपाडा वीज वितरण शाखेला वारंवार विद्युतपुरवठा खंडित होण्याबाबत आणि इतर तक्रारींबाबत अवगत केले होते. त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने निवेदनात सांगितल्याप्रमाणे सोमवारी आंदोलन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बंदला सर्वपक्षीय, पत्रकार, नागरिक व सेवाभावी संघटनांचा पाठिंबा मिळाला. खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, माजी सभापती रमेश पाटील, माजी उपसभापती गजानन मांडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज सोमाणी, सचिव सचिन मालकर, व्यापारी प्रतिनिधी अमित शाह, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष (कर्जत-खालापूर विभाग) अभिजित घरत आदींसह शेकडो विजग्राहक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान रसायनी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मोहोपाडा वीज वितरण शाखेचे अधिकारी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आल्यावर त्यांना व्यापारी व नागरिकांचा संताप पाहायला मिळाला. रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजय खारकर, उद्धवसेना शहर प्रमुख नीलेश जुनगरे, वासांबे विभाग संपर्क प्रमुख अनिल पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) चे कोकण विभाग कामगार सेलचे अध्यक्ष अरूण गायकवाड, श्री समर्थ सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष अरविंद पाटील उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी महावितरण आवश्यक ती उपाययोजना तत्काळ सुरू करत आहे. प्रलंबित मेंटेनन्सची कामे आठ ते दहा दिवसांत करण्यात येतील. वीजपुरवठा सुरळीत व अखंडित राहावा, यासाठी तांत्रिक कामे सत्वर करण्यात येतील. संबंधित यंत्रणेवर सतत देखरेख ठेवून समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल. ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे व्ही.एम. शिंदे, कार्यकारी अभियंता, पनवेल (ग्रामीण), एम.बी. राख, उपकार्यकारी अभियंता, पनवेल २ यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg